अभिरूप (मॉक) मुलाखत

सिव्हिल न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) स्पर्धात्मक मुख्य परीक्षा – २०२२
मुख्य परीक्षा जाहिरात क्र.०४०/२०२४

सिव्हिल न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) स्पर्धात्मक मुख्य परीक्षा – २०२२ (जाहिरात क्र.०४०/२०२४) च्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या “विनामूल्य” अभिरूप मुलाखती (मॉक), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, राजर्षी शाहू अकॅडमी, प्रशासकीय भवन, लक्ष्मीनगर पर्वती, पुणे -०९ येथे घेण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील ऑनलाईन फॉर्म भरून नाव नोंदणी त्वरित करावी.
नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करून आम्ही अभिरूप (मॉक) मुलाखतीची दिनांक कळविणार आहोत.

नाव नोंदणी : www.rajarshishahu.academy या संकेतस्थळावर करावी. तेथील Latest News
अंतर्गत असलेल्या “विनामूल्य मॉक इंटरव्ह्यूबाबत” येथे क्लिक करून तेथे दिलेल्या Registration Form खाली दिलेल्या लिंकद्वारे किंवा सोबतचा QR Code स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरून नाव नोंदणी करावी.

अभिरूप (मॉक) मुलाखतीचे ठिकाण :- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, राजर्षी शाहू अकॅडमी, प्रशासकीय भवन, शाहू कॉलेज कॅम्पस, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे ४११००९. 
 
अभिरूप (मॉक) मुलाखत पॅनल मेंबर :-
१)  श्री. बी. डी. गायकवाड – माजी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश.
२)  श्री. शरद दि. मडके – माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.
३)  श्री. सुभाष ग. हरतालकर – माजी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश.
 
 
संपर्क : डॉ. रमा लोंढेपाटील – ८६०००१४३६७.  सौ. उमिता जाधव – ९८२२८२८१६६  
 
टीप : MOCK INTERVIEW दिवशी एक फोटो आणि प्रोफाईलची एक साक्षांकित प्रत घेऊन येणे.