अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची
राजर्षी शाहू अकॅडमी, पुणे
service-3-1

करिअर संदर्भात समुपदेशन

अकॅडमीत प्रवेशित विद्यार्थ्यांना स्वतःचा कल आणि आवड चांगल्या प्रकारे ओळखून त्यानुसार स्वतःसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधींचे ज्ञान मिळविण्यास मदत आणि दिशादर्शन करणारी दोन दिवसीय अनोखी समुपदेशन आणि अभिमुखता कार्यशाळा आम्ही आयोजित केली आहे.

स्पर्धापरीक्षा

सरकारी नोक-यांमधील स्थैर्य आणि सुरक्षितता यांमुळे भारतीयांना सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रांतील नोक-यांचे आकर्षण आहे. या दृष्टीने अकॅडमीचा इन हाऊस फाऊंडेशन कोर्स(अंतर्गत पायाभूत अभ्यासक्रम) आखण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञान आणि प्रशासकीय वैशिष्ट्ये विकसित करण्याची कौशल्ये पुरवून पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींसाठी त्यांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमांतर्गत करवून घेतली जाईल
service-3-2
service-3-3

रोजगार कौशल्ये

कौशल्य प्रदान करणा-या आणि प्रशिक्षण सेवा पुरविणा-या सर्व आघाडीच्या संस्थांच्या सहयोगाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या आणि शिकविल्या जाणा-या सर्व कौशल्य उपक्रमांना एका चौकटीत सामावून आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत जेणेकरून होतकरू युवक स्वतःच्या गुणवत्तेवर रोजगार मिळवू शकतील आणि स्वतःची कारकीर्द घडवू शकतील.

उद्योजकता कौशल्ये

वर्तमान युगात तरुणाई स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे आकर्षित होत आहे. या नवउद्योजक तरूण वर्गाला काळजीपूर्वक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वित्त, व्यापार आणि उद्योग जगातील तज्ज्ञांशी सहयोग साधणार आहोत.
service-3-2