अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची
राजर्षी शाहू अकॅडमी, पुणे

व्हिजन

राजर्षी शाहू अकॅडमी ही शेती, व्यवसाय, सेवा, उद्योग, व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रामध्ये बहुजन समाजाच्या विकासासाठीचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन असलेले केंद्र बनावे.

मिशन

महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा तथा इतर विविध क्षेत्रातील तत्सम स्पर्धा परीक्षांसाठी बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थाना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द, व्यवसाय अथवा रोजगार / स्वयंरोजगार यासाठी प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रमांतून शिक्षित व प्रशिक्षित करणे.

उद्दिष्ट्ये

 • अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेला आदर्श स्थानी असलेल्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, उद्यमी आणि नेतृत्व विकासासाठी अकॅडमीचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करणे.
 • सार्वजनिक सेवा परीक्षा आणि इतर सेवा परीक्षांसाठी प्रशिक्षण प्रदान करणे.
 • एन. एस. क्यू. एफ. (NSQF) ला अनुरूप आणि उद्योग विश्वाला आवश्यक (टेलर मेड) कौशल्य विकास प्रशिक्षण सुविधा प्रदान करणे.
 • प्रशिक्षण गरज विश्लेषण आणि रोजगाराच्या संधी पुरविणे.
 • रोजगारासाठी / स्वयंरोजगारासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे.
 • व्यवसाय आणि उद्योजकता कार्यांसाठी महिलांच्या क्षमतांना चालना देणे.
 • अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांना (पुरुष आणि स्त्रिया) कौशल्ये सुधारण्यासाठी प्रशिक्षण देणे.
 • कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार यासाठी नामांकित संस्था व व्यवसायांचा सहयोग घेणे.
 • एनएसडीसी, आयजीटीआर आणि इतर मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रे स्थापन करुन एनएसडीसीच्या सहकार्याने कौशल्य प्रशिक्षण देणे.
 • डिजिटल पातळीवर अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि सुविधा केंद्र स्थापन करणे.
 • इच्छुक उमेदवारांना निवासाची सुविधा पुरविणे.
 • इच्छुक उमेदवारांना डीपीआर तयार करण्यासाठी, सरकारी, आर्थिक व कायदेशीर संस्थांची सल्ला तथा मंजुरी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे.
अकॅडमीची संरचना

अकॅडमीची संरचना

"राजर्षी शाहू अकॅडमी" दोन व्यापक क्षेत्रांत कार्य करेल
१. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
२. कौशल्य विकास केंद्र

राजर्षी शाहू अकॅडमी, पुणे
कार्यकारिणी

माननीय श्री शरदराव पवार

अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री अजितदादा पवार

उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री शशिकांत सुतार

उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्रीमती प्रमिला गायकवाड

सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री संदीप कदम

संयुक्त चिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री भगवानराव साळुंखे

संयुक्त चिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री वसंतराव थोरात

खजिनदार, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री विजयसिंह जेधे

खजिनदार, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे

माननीय श्री धैर्यशील वंडेकर

सदस्य, विकास समिती, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, पुणे, विमान तज्ञ आणि विश्लेषक

माननीय श्री प्रभाकर देशमुख

सेवानिवृत्त सचिव, महाराष्ट्र शासन

माननीय श्री मधुकर कोकाटे

माजी अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

माननीय डॉ. सर्जेराव निमसे

माजी कुलगुरू, लखनौ विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

माननीय श्री नवनाथ पासलकर

माजी संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य व माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

माननीय श्री राजेंद्र कोंढारे

अध्यक्ष, शिवसह्याद्री चॅरिटेबल फॉउंडेशन, पुणे